मुंबई, दि. १२ : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
दि. २७ जून ते दि. १२ जुलै, २०२४ या दरम्यान अधिवेशनाच्या कामकाजात एकूण बैठकींची संख्या १३, प्रत्यक्षात झालेले कामकाज ६० तास, २६ मिनिटे, रोजचे सरासरी कामकाज ४ तास ३८ मिनिटे, अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ.
६ तास १० मिनिटे, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय ०४ सदस्य, अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले ०२, शोक प्रस्ताव ५, अभिनंदनपर प्रस्ताव १,
तारांकित प्रश्न प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या १४९४, स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या ४२८, उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या ५५ अशी होती.
अतारांकित प्रश्न प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या २, तारांकित प्रश्नांतून अतारांकित झालेल्या प्रश्नांची संख्या ३५६, प्राप्त झालेल्या उत्तरित प्रश्नांची संख्या (मागील सत्रातील स्वीकृत प्रश्नांसह) १८०, अल्पसूचना प्रश्न प्राप्त झालेली संख्या निरंक,स्वीकृत झालेली संख्या निरंक, उत्तरित झालेली संख्या निरंक, सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीसंबंधी अर्धा तास चर्चेच्या सूचना प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या – प्राप्त झालेली संख्या २४, स्वीकृत झालेली संख्या १३, चर्चा झालेली संख्या ०१, इतर बाबीतील (सर्वसाधारण) प्राप्त झालेली संख्या ४१, स्वीकृत झालेली संख्या ३३, चर्चा झालेली संख्या ०४
म.वि.प. नियम ९३ अन्वयेच्या सूचना : प्राप्त सूचना ५२, स्वीकृत सूचनांची संख्या १३, सभागृहात निवेदने झालेल्या सूचनांची संख्या १३, सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली एकूण निवेदने ९, म.वि.प.नियम २६० अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या ०४, चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या ०४,
म.वि.प.नियम २८९ अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या ३३, मान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक, चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक.
शासकीय ठराव, सूचनांची संख्या १, लक्षवेधी सूचना प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या ५४९, मान्य झालेल्या सूचनांची संख्या १२८,चर्चा झालेल्या सूचनांची संख्या ३३, विशेष उल्लेखाच्या सूचना प्राप्त सूचनांची संख्या १९०, मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या : १५७.
औचित्याचे मुद्दे : प्राप्त झालेले औचित्याचे मुद्दे १०९, मांडण्यात व पटलावर ठेवण्यात आलेले औचित्याचे मुद्दे ८३, नियम ४६ अन्वये मंत्री महोदयांनी केलेली निवेदने ०२, नियम ४७ अन्वये केलेली निवेदने निरंक.
अल्पकालीन चर्चा (म.वि.प.नियम ९७ अन्वये )प्राप्त सूचनांची संख्या ०८, मान्य झालेल्या सूचनांची संख्या ०८, चर्चा झालेल्या सूचना निरंक.
शासकीय विधेयके – विधानपरिषद ०३, विधानपरिषद विधेयके पुरःस्थापित करण्यात आली ०३,संमत करण्यात आलेली विधेयके.
विधानसभा : विधानसभा विधेयके पारित करण्यात आली ०६, विधानसभेकडे शिफारशीशिवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके (धन विधेयक) ०३, संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक, अशासकीय विधेयके, प्राप्त झालेल्या सूचना ०६, स्वीकृत सूचना ०३, पुरःस्थापना ०३, विचारार्थ ०३.
अशासकीय ठराव : एकूण प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या ९०, स्वीकृत झालेल्या सूचनांची संख्या ७५,चर्चा झालेल्या सूचनांची संख्या निरंक, अंतिम आठवडा प्रस्तावाची संख्या ०१, सन्माननीय सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती ९० टक्के, कमीत कमी उपस्थिती ४४ टक्के, एकूण सरासरी उपस्थिती ७७.०८ टक्के राहिली.
०००
राजू धोत्रे/विसंअ