मुंबई,दि.6 : शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात नागपूर येथील पद्मश्री अजित वाडेकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुदानासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार प्रकाश गजभिये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयामधून मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार होतील आणि देशामध्ये नाव करतील. अनुदानासंदर्भातचा प्रस्ताव विभागाने तयार करून वित्त विभागाला पाठवावा. त्यानंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येईल आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ