मुंबई शहर व उपनगरमधील महाविद्यालयांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जाची प्रक्रिया तातडीने करण्याचे आवाहन

0
14

मुंबई, दि. ८ : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्विकृती दि. २५ जुलै २०२४  पासून सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहर/ उपनगरमधील अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेल्या अर्जाबाबत पुढील प्रक्रिया करावी, असे आवाहन मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन मंजूर करावेत. दरवर्षी प्रमाणे नोंदणीकृत झालेल्या अर्जापैकी नूतनीकरण अर्जाचे प्रमाण नवीन अर्जाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरील नुतनीकरणाचे अर्ज प्रथम प्राधान्याने पडताळणी करुन ऑनलाईन मंजूर करुन संबधित सहायक आयुक्त, समाज कल्याण, ( मुंबई शहर/उपनगर) यांच्या लॉगीनकरिता तात्काळ पाठवावेत. तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाही, यांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे श्री.खैरनार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here