छत्रपती संभाजीनगर, दि.29 (जिमाका) – खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा, पाणी, वीज, एसटी बस, स्वच्छतागृह त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जर जरी जर बक्ष उरुस यात्रेनिमित्त सुविधांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ, नगरपालिका मुख्याधिकारी विक्रम दराडे, उरुस समिती अध्यक्ष मोहमद याजाज, इमरान जागिरदार, बैठकीस उपस्थित होते.
मंत्री सत्तार म्हणाले की जर जरी बक्ष उरुसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच खुलताबाद येथील ऐतिहासिक दरवाज्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे खुलताबाद येथील ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन केले जाणार आहे.
00000