नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविण्याचे काम सुरू

0
353

मुंबई, दि.९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत कार्यालयाकडे प्राप्त होणारी १० लाखांपर्यंतची कामे विनानिविदा बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना काम वाटप समितीमार्फत वाटप करण्यात येतात. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त कामे वाटप करण्याकरीता मुंबई शहर जिल्ह्यामध्ये कार्यरत नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

कार्यरत नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी तरी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये संस्थांनी त्यांच्या संस्थेचा प्रस्ताव संस्थेच्या लेटरहेडवर संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, सर्व सभासदांची अद्ययावत यादी, संस्थेचा सन-२०२१-२०२२ व २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रांसह दि. १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत या कार्यालयास सादर करावा असे, आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here