मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विंचूर येथे ७ कोटी निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न

0
33

नाशिक, दिनांक : 10 सप्टेंबर 2024 (जिमाका वृत्तसेवा ): अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज निफाड तालुक्यातील विंचूर येथील ७ कोटी निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, सरपंच ज्ञानेश्वर शेवाळे सचिन दरेकर, दत्तूपंत डुकरे, विनोद जोशी, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

या कामांचे झाले भूमिपूजन व उद्घाटन

जैन स्थानक
१. ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेवर सभामंडप बांधणे भूमिपूजन-(र.रु.१५ लक्ष)
२.विंचूर-डोंगरगांव रस्ता प्रजिमा-१२५ किमी ३६/४०० ते ३७/७०० मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे –
(र.रु. १५० लक्ष)
३. वार्ड क्र.६ मध्ये भूमिगत गटार बांधकाम करणे-भूमिपूजन-(र.रु.१०.०० लक्ष)
४.विंचूर डोंगरगांव येथे भूमिगत गटार बांधणे भूमिपूजन-(र.रु.१०.०० लक्ष)
५. खंडेराव मंदिरासमोर सभामंडप बांधणे उद्घाटन-(र.रु.१५.०० लक्ष)
६. शनिमंदिर परिसरात सुशोभीकरण करणे-भूमिपूजन-(र.रु.१५.०० लक्ष)
७. जैन समाजासाठी सभामंडप बांधणे-(र.रु.२०.०० लक्ष)
८. जाधव वस्तीवर ग्रामपंचायतीच्या जागेवर सभामंडप बांधणे-भूमिपूजन-(र.रु.१५.०० लक्ष)

नेहरू चौक
१. तलाठी कार्यालय-निवासस्थान  बांधणे भूमिपूजन-(र.रु.३०.०० लक्ष)
२. मंडळ कार्यालय व निवासस्थान बांधणे-भूमिपूजन-(र.रु.१५.०० लक्ष)
३. दशक्रिया विधी रस्ता कॉक्रीटीकरण करणे-भूमिपूजन-(र.रु.२०.०० लक्ष)
४.दशक्रिया विधी शेड व अनुषंगिक कामे करणे-उद्घाटन-(र.रु.१८.०० लक्ष)
५. दशक्रिया विधी परिसरात अनुषंगिक कामे करणे-उद्घाटन-(र.रु.२०.०० लक्ष)
६. दशक्रिया विधी परिसरात कॉक्रीटीकरण करणे-भूमिपूजन-(र.रु.१०.०० लक्ष)

राऊत वस्ती
१.विंचूर रोड ते राऊत वस्ती विठ्ठलवाडी रस्ता ग्रामा-२२५ मध्ये किमी ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे भूमिपूजन (र.रु.१५० लक्ष)
२.विंचूर ते टाकळी  विंचूर किमी ०/०० ते १/५०० रस्त्याची सुधारणा करणे –उद्घाटन(र.रु.२०.०० लक्ष)
३. अंगणवाडी शाळेजवळ सीडी वर्क बांधणे-भूमिपूजन(र.रु.१०.०० लक्ष)

विंचूर अभ्यासिकेजवळ
१. विंचूर विद्यार्थी/विद्यार्थिनी अभ्यासिका बांधणे उद्घाटन-(र.रु.५०.०० लक्ष)
२. इदगाह करीता संरक्षक भिंत व ओटा बांधकाम करणे-भूमिपूजन-(र.रु.२०.०० लक्ष)
३.उर्दू शाळा,इस्लामपुरा दुरुस्ती करणे-भूमिपूजन-(र.रु.४.५० लक्ष)
४. इदगाह संरक्षण भिंत बांधणे व अनुषंगिक कामे करणे-उद्घाटन (र.रु.१२.०० लक्ष)

संदीप शिरसाठ यांचे घराजवळ
१. गट नं.२९४ येथे समाजासाठी सभामंडप बांधणे-भूमिपूजन (र.रु.१५.० लक्ष)
२. गणेश मंदिर समोर सभामंडप बांधणे-(र.रु.१५.०० लक्ष)
३. बुरड समाजाकरीता सभामंडप बांधणे-भूमिपूजन(र.रु.१०.०० लक्ष)
४. वार्ड क्र.५ जुना गोंदेगांव रोड ते हरीओम रस्ता कॉक्रीटीकरण करणे-भूमिपूजन (र.रु.१०.०० लक्ष)

१.सावता महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधणे-भूमिपूजन (र.रु.२०.०० लक्ष)
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here