मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

मुंबई, दि. ११ :  मुंबईतील पशूवधगृह येथे पशूवधगृहाची जागा वगळून इतर जागेत प्राण्यांसाठी आश्रयस्थळ उभारण्यासाठी  बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागा निश्चित करावी. यासाठी महानगरपलिका किंवा शासकीय आरक्षित जागेवर आश्रयस्थळ उभारावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष संदीप निचित यांनी आज दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.निचित यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व) येथे झाली. या बैठकीस उपायुक्त पशुसंवर्धन तथा सदस्य सचिव डॉ.शेलेश पेठे, देवनार पशुवधगृहाचे सहायक महाव्यवस्थापक डॉ.सचिन कुलकर्णी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश वानखेडे आधि उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी श्री.निचित म्हणाले की, प्राण्यांकरिता आश्रयस्थळ उभारण्यासाठी पशुधनाची संख्या विचारात घ्यावी. त्याकरिता आवश्यक जागा निश्चित करावी. याकरिता एमएमआरडीए, म्हाडा, मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी यांच्याकडील आरक्षित जागेची आवश्कयतेनुसार मागणी करावी. जागेची मागणी करताना योग्य ते प्रयोजन देण्यात यावे.

०००

संजय ओरके/ वि.सं.अ