माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार – माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. 7 : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेवून आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

माजी सैनिक कल्याण महामंडळाची मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण महामंडळाचे सचिव  डॉ.प्रशांत नारनवरे  उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, माजी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, स्वयंरोजगाराच्या योजनांसाठी नव्याने आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत सर्व योजनांचा आढावा घ्यावा. माजी सैनिकांसाठी आलेला शंभर टक्के निधी खर्च करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना, कार्ये आणि जबाबदाऱ्या, उपलब्धी, कार्यालयीन मनुष्यबळ यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

****

संध्या गरवारे/विसंअ/