मुंबई, दि. 23 : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल प्राप्त करून देणाऱ्या विभागापैकी तिसरा महत्वाचा विभाग आहे. या विभागातील निरीक्षक व अधिक्षकांच्या कार्यालयांचे बांधकाम टाईप प्लॅननुसार करण्यात येत आहे. शासनाने विभागाच्या राज्यातील 42 ठिकाणच्या विविध बांधकामासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यापैकी 9 बांधकामे पूण झालेली आहेत.
पूर्ण झालेल्या बांधकामांमध्ये राज्य उत्पादन शुल्क भवन मुंबई, नाशिक अधीक्षक यांचे निवासस्थान, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जालना, हिंगोली, अमरावती, कर्मचारी निवासस्थान वाशिम, निरीक्षक कार्यालय संरक्षक भिंत तळेगांव दाभाडे जि. पुणे, निरीक्षक कार्यालय व निवासस्थान संगमनेर जि. अहिल्यानगर, भरारी पथक निरीक्षक कार्यालय सटाणा जि. नाशिक यांचा समावेश आहे. विभागातील सर्व कार्यालये अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नविन आकृतीबंध मंजूर झालेला आहे. विभागासाठी मंजूर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या 3 हजार 842 इतकी आहे. विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण अंदाजे 23,289 कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे. विभागाची आयुक्त कार्यालयाची फोर्ट, मुंबई येथे सात मजली इमारत असून या इमारतीच्या बांधकामास सन 2024 ची उत्कृष्ट शासकीय इमारत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गत 4 ते 5 वर्षापासून या विभागातील जिल्हा व उपविभागीय स्तरावरची बांधकामे सुरू आहेत. शासनाने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी उत्पादन शुल्क विभागातील बांधकामासाठी 110.47 कोटी निधीची तरतूद केली आहे.
००००
निलेश तायडे/विसंअ