मुंबई, दि.16 : माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांना वाहिली आहे.
शोकसंदेशात मंत्री श्री.पाटील म्हणतात, एक शांत, अजातशत्रू व सोज्वळ नेता म्हणून हरिभाऊ कायम स्मरणात राहतील. लोकाभिमुख कामांमुळे त्यांनी विधानसभा आणि लोकसभेत आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने जळगाव जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.