शिवकालीन शिवशस्त्र व वाघनखे बघण्याची नागपुरकरांना संधी

🔸७ फेब्रुवारी रोजी खुले होणार मध्यवर्ती संग्रहालयाचे द्वार

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते भव्य शुभारंभ

🔸मध्यवर्ती संग्रहालय येथे ऐतिहासिक वाघनखांच्या विशेष आकर्षणासह शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाच्या दालनाचे उद्घाटन

नागपूर,दि. ६ : महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवकालीन इतिहास हा प्रत्येकाच्या मनात शौर्याची भावना निर्माण करणारा आहे. राज्यातील गड किल्ले व शिवशस्त्र हे या शौर्याच्या इतिहासाचे दीपस्तंभ म्हणून आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. या शौर्याच्या गाथेतील प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनामनात जपलेली शिवरायांची वाघनखे व शिवकालीन शस्त्र पाहण्याची अपूर्व संधी विदर्भवासियांना नागपूर येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शिवकालीन शस्त्र व वाघनखे प्रदर्शनासाठी येथील मध्यवर्ती संग्रहालय येथे विशेष दालन निर्माण करण्यात आले असून पर्यटकांसाठी सुविधा केंद्राची निर्मिती केली आहे. व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय, लंडन येथून सर्वांना पाहण्यासाठी आणलेली वाघनखे व यासोबत शिवशस्त्र हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता होणार असून यानिमित्त सुरेश सभागृह येथे याचे लाईव्ह प्रक्षेपण व मुख्य उद्घाटन सोहळा संपन्न होईल.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याहस्ते हे उद्घाटन होईल. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहील.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, सुधाकर आडबाले, परिणय फुके, कृपाल तुमाने, विधान सभा सदस्य नितीन राऊत कृष्णा खोपडे, प्रविण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, समीर मेघे, चरणसिंग ठाकुर, आशिष देशमुख संजय मेश्राम व मुधोजीराजे भोसले, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्परमुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी विशेष उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालकडॉ. तेजस गर्गे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
0000