मुंबई दि. 18: ‘मेरी झांसी नही दूंगी’ असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री म्हणाले, भारतीय महिलाशक्तीच्या धैर्याचा, शौर्याचा, त्यागाचा, निर्धाराचा, ममत्वाचा संगम राणी लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनुभवायला मिळतो. आज चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य ज्या निर्धाराने लढत आहे ते पाहता राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचा वारसा आपण निश्चितच जपला आहे, याची खात्री पटते. देशाच्या सन्मानासाठी, स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या महापराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांना विनम्र अभिवादन करतो.
0000