एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करावा -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. 14 : मराठी चित्रपटांसाठी एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी वेळोवेळी मांडलेल्या समस्यांपैकी एक पडदा चित्रपटगृहाच्या समस्यांसंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक झाली.

राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु आहेत. त्यामुळे उर्वरित सिनेमागृहांच्या सद्यस्थितीबद्दल उपलब्ध माहिती मिळवावी आणि बंद असलेली चित्रपटगृहे चालू करून त्यांनी फक्त मराठी सिनेमा दाखवावा आणि या चित्रपटगृहांना सवलती देण्याबाबतच्या स्वतंत्र योजनेचा मसुदा तयार करण्यात यावा, असे ॲड.  शेलार यांनी निर्देश दिले.

000

संजय ओरके/विसंअ