भंडारा,दि.19 :- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विश्राम भवन भंडारा येथे विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील इथेनॉल प्रकल्पाकरिता सुमारे 55 हेक्टर जमीन उपलब्धतेबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राजु कारेमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसिलदार अक्षय पोयाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्यांबाबत अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण तोडगा काढला. सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनश्रेणीबाबत 30 जूनपर्यंत मार्गदर्शन मागवून प्रकरण सादर करण्याच्या सूचना अध्यक्षांनी शिक्षण विभागाला दिल्या. जिल्हा उपनिबंधक भंडारा व मजूर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांचे समवेत अध्यक्षांनी चर्चा केली. लाखनी तालुक्यातील रामपुरी येथील अपूर्ण तलावाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.