कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

मुंबई, दि. ४ : कामगार विभागाच्या अधिपत्याखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-ब पदी नियुक्त चार उमेदवारांना कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ह्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

कामगार विभागात नव्या अधिकाऱ्यांच्या या भरतीमुळे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून, राज्यातील औद्योगिक सुरक्षेसंबंधी उपाययोजनांना गती मिळणार असल्याचे कामगार मंत्री ॲड. फुंडकर यावेळी म्हणाले.

०००