मुंबई, दि.०४: मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालयामार्फत ६ मार्च, २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, विद्यालंकार मार्ग वडाळा, (पू.) मुंबई-३७ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या मेळाव्यात इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थांना त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्ये याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकांमार्फत समुपदेहान (करिअर टॉक) देण्यात येणार आहे. तसेच वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी करिअर व रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांना करिअर मार्गदर्शन आणि वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी जिल्ह्यातील नियोक्त्यामार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र (Appointment Letter) देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
०००
मोहिनी राणे/विसंअ/