उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. २२ : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
Status Quo on MOUs with Chinese companies
The memorandums of understanding (MOUs) signed on June 15, 2020, between the Industries Department of Maharashtra and three Chinese companies have been placed on hold (as-is-where-is) by the Maharashtra government.
Confirming this Maharashtra’s Industries Minsiter Subhash Desai clarified, “Status quo will be maintained on the MOUs with the Chinese companies for the moment. This does not mean that they have been rescinded or cancelled. In fact, further developments on the same are awaited.”
The three Chinese companies namely – Hengli, PMI Electro Mobility Solutions (joint venture with Foton) and Great Wall Motors – have committed to an investment of Rs 250 crore, Rs 1000 crore and 3770 crore respectively in the Talegaon industrial belt of Maharashtra (phase II) in Pune for which the MOUs were signed on June 15, 2020. “The Maharashtra government is awaiting clear policy directions from the Union Government, on these three projects collectively worth Rs 5,020 crore, in the wake of the currently changed environment in India,” Desai further clarified.