मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

मुंबई, दि. ६ : मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतला. इंद्रप्रस्थ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचे उद्यान करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

सुरुची शासकीय निवासस्थानी मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी मीरा-भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता  भगवान चव्हाण, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद शिंगटे, सहायक संचालक (नगररचना) पू.म.शिंदे, तहसीलदार सचिन चौधरी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, घोडबंदर किल्ल्यापासून शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत व शहरातील अंतर्गत रस्त्याबाबत, साई पॅलेस हॉटेल ते ठाकूर मॉल रस्ता कामांचा, अंतर्गत पाणी पुरवठा योजना सद्यस्थिती (सुर्या प्रकल्प योजनेअंतर्गत), सीबीएसई शाळा सुरू करण्याबाबत, चेना रिवर फ्रंट कामांबाबत- घोडबंदर खाडीकिनारा विकसित करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला.

दिव्यांगांना मीरा – भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देणार

इतर महानगरपालिकांमध्ये दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुविधांप्रमाणे मिरा-भाईंदर महानगरपालिकेतही सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देशही श्री. सरनाईक यांनी दिले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आठवड्यातील ५ ही दिवस सुरू राहणार

नवीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भाईंदरकरिता उत्तन येथील शासकीय जागा निश्चित करण्यात आली असून तिथे तात्पुरत्या स्वरूपाचे कार्यालय सुरू करुन लायसन्स देणं, वाहन नोंदणी व अनुषंगिक सर्व कामे त्या कार्यालयातून सुरू करावीत. परिवहन कार्यालय आठवड्यातील ५ ही दिवस सुरू ठेवावे. असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

यावेळी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व इतर विकास कामांबाबतही आढावा घेण्यात आला.

0000

मोहिनी राणे/ससं/