राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा मंत्रालयातील दालनात प्रवेश

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. ०७: राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. राज्यमंत्री पदाचा कार्यभार राज्यमंत्री नाईक यशस्वीरीत्या पार पाडतील, अशा शुभेच्छा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विभाग, पर्यटन, मृद व जलसंधारण या विभागाचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे.

मंत्रालयात  सातव्या मजल्यावर विस्तार इमारतीत दालन क्रमांक  ७२२, ८२२ अ, ७२४ या ठिकाणी त्यांचे दालन आहे.

०००