समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा ध्यास असणारा विकासाचा अर्थसंकल्प – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १०: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी हित आणि शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा, विकासाचा ध्यास आणि विकसित महाराष्ट्र घडविणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सन  2025-26 या आर्थिक वर्षासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी 3 हजार 98 कोटी रुपयांची तरतुदी करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यात येणार आहे. महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्यासाठी अन्नसुरक्षा, निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून, त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडविण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/