महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.12: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान  स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

 

धोंडिराम अर्जुन/स.सं