राज्यपालांकडून कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचा आढावा

मुंबई, दि. १२ : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे  (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमोर विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले.

यावेळी राज्यपालांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, गुणवत्ता सुधार, विद्यापीठाद्वारे राबविले जाणारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, कौशल्य अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव, माजी विद्यार्थी संघटनांचा विद्यापीठ विकासात सहभाग, आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, सामायिक वेळापत्रक, वसतिगृह सुविधा, क्रीडा विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम यांबाबत आढावा घेतला.

बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ विजय कुंभार व  संचालक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) डॉ. महेंद्र अहिरे, आदी उपस्थित होते.

०००