नवी दिल्ली, १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, सर्वश्री खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, शोभा बच्छाव, नरेश मस्के, बाळुमामा म्हात्रे, निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे, श्यामकुमार बर्वे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यासह अतिरीक्त निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सदनातील अतिथी मान्यवरांनी आणि महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कोपर्निकसमार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण जयंती दिनी अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात प्रभारी उपसचांलक अमरज्योत कौर अरोरा यांनी यशवतंराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००