न्यूझीलॅंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सोन यांचे मुंबईत आगमन

Oplus_131072

मुंबई, दि. १९ : न्यूझीलॅंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सोन यांचे शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सकाळी आगमन झाले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी भारताच्या उच्चायुक्त नीता भूषण, न्यूझीलँडचे उच्चायुक्त पॅट्रिक राता, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विदेश मंत्रालयाचे सहसचिव प्रमिला त्रिपाठी, न्यूझीलँडचे मुंबईतील राजदूत ग्राहम राऊस, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

न्यूझीलॅंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सोन यांनी पुढील नियोजित कार्यक्रमासाठी प्रस्थान केले.

0000