मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे स्वागत

मुंबई, दि. १९: न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सेन हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज येथे त्यांची भेट घेऊन स्वागत केले.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आश्विनी भिडे, सह सचिव विद्युत वरखेडकर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी  न्यूझीलंडचे  प्रधानमंत्री लक्सेन यांचेशी कृषी, शिक्षण, औद्योगिक आदी विषयांवर धोरणात्मक चर्चा केली.

०००

मोहिनी राणे/ससं/