नागपूर दि. ०६: श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील श्री पोद्दारेश्वर राममंदिरात दर्शन घेऊन पूजन केले.
श्री पोद्दारेश्वर मंदिर समितीतर्फे काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेस मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, डॉ.आशिष देशमुख, कृष्णा खोपडे, कृपाल तुमाने, डॉ. नितीन राऊत, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, श्री पोद्दारेश्वर राम मंदिराचे विश्वस्त महेंद्र पोद्दार आदी उपस्थित होते.
मंदिरात उपस्थित भाविकांना फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात केलेल्या श्रीरामांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला होता. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००