जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत

मुंबई दि.२१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘जागतिक वसुंधरा दिनानिमित्त’ पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २२ आणि बुधवार दि. २३ एप्रिल २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. २३ एप्रिल २०२५ रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर रात्री ८.०० वा. खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जगभरात दरवर्षी २२ एप्रिल रोजी ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने पर्यावरण, वातावरणीय बदल विभागामार्फत २२ एप्रिल ते मे २०२५ पर्यंत म्हणजेच महाराष्ट्र दिनापर्यंत वसुंधरेची आराधना करण्यासाठी हे नऊ दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांची सुरूवात २२ एप्रिल रोजी पवई लेक, मुंबई येथून स्वच्छता मोहिमेद्वारे सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक गावातील पाण्याचे विविध स्त्रोत तसेच नद्या, नाले, तलाव ह्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम व त्यांची अंमलबजावणी याविषयी माहिती ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

000