यवतमाळ, दि. २८: लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती व सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे शपथ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्या उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली.
यावेळी मंत्री वुईके यांच्यासह जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा समन्वयक अधिकारी फिरोज पठाण यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी उपस्थितांना लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत शासकीय सेवा पारदर्शक पद्धतीने, विहित कालमर्यादेत व सौजन्याने पात्र व्यक्तींना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशिलतेने, तत्परतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी शपथ दिली.
०००