मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

मुंबई, दि. ६ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींशी संवाद साधला.

भारत निवडणूक आयोगाने विविध हितधारकांशी सातत्यपूर्ण व व्यापक संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी थेट संवाद सुरू केला आहे. या संवादाद्वारे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहोचवता येतील, यासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

सर्व संबंधित पक्षांच्या सहकार्याने विद्यमान कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रियेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोगाने हा पुढाकार घेतला आहे.

आयोगामार्फत आतापर्यंत ४,७१९ सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी, ८०० जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी यांनी सहभागी होऊन २८ हजारांहून अधिक राजकीय प्रतिनिधींशी संवाद साधला आहे, असे भारत निवडणूक  आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

0000

बी.सी.झंवर/विसंअ/