मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतिगृहाचे उद्घाटन

अहिल्यानगर दि. ६ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या ‘सिंधू’ वसतीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोनशीला अनावरण  करून करण्यात आले.  या नूतन वसतिगृहात ६०० मुलींच्या राहण्याची क्षमता आहे.

कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे,  माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे-पाटील, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.