‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते.

सूतगिरणीमुळे परिसरात नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे.  चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून यामुळे परिसरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तसेच रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्यामुळे या परिसरातील दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिली आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्र रस्ते विकास संस्थे अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुतगिरणी याच रस्त्यावर होत असल्याने  ५. ५० मीटर डांबरी धावपट्टी प्रस्तावित करुन राज्य शासनाने नव्याने या रस्ता कामाला मान्यता दिली आहे. पाच वर्षात देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची देखील तरतुद करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.