अहिल्यानगर, दि. ६ : – चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य आदी उपस्थित होते.
मृद व जलसंधारण विभागाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’, जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना यांसारख्या इतर योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. पुस्तिकेत जिल्ह्याच्या या यशाची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची उत्तम कामे करणाऱ्या गावातील यशोगाथांचा समावेशही या पुस्तिकेत करण्यात आला आहे. पुस्तिका जलसंधारण कामांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.