मुंबई, दि.१४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार प्रकाश सोळंके, अमरावतीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
000000
श्री. धोंडिराम अर्जुन/स.सं