भारत निवडणूक आयोगातर्फे चार राज्यांतील ३५० बीएलओंचे प्रशिक्षण

मुंबई, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), येथे बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) पर्यवेक्षकांसाठी सातव्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू झाले. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश येथील बीएलओ, बीएलओ पर्यवेक्षक व मतदार नोंदणी अधिकारी यांना संबोधित केले.

एकूण ३५३ स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यामध्ये उत्तर प्रदेशातून १०१, उत्तराखंडमधून ८२, राजस्थानमधून ८३ आणि हिमाचल प्रदेशमधून ८७ अधिकारी आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये, निवडणूक आयोगाने नवी दिल्लीमध्ये एकूण ३,३५० क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावेळी म्हणाले, निवडणुका लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक आचारसंहिता नियम १९६१ आणि वेळोवेळी आयोगाकडून दिलेल्या सूचनांनुसार निवडणुका पार पाडणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाद्वारे सहभागी अधिकारी मतदार यादी संदर्भातील अंतिम निर्णयावर अपील कसे करावे, याची माहिती घेतील. यात जिल्हाधिकारी/ कार्यकारी दंडाधिकारी अंतर्गत कलम २४(अ) व राज्य/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) अंतर्गत कलम २४(ब) यांचा समावेश आहे. बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षक याबाबतची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवतील, असेही त्यांनी सांगितले.

६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान पार पडलेल्या स्पेशल समरी रिव्हिजन (SSR) प्रक्रियेनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमधून कोणतेही अपील प्राप्त झाले नव्हते.

प्रशिक्षणाचा उद्देश

हे प्रशिक्षण मतदार नोंदणी, अर्ज प्रक्रियेची हाताळणी, आणि निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत आकलन वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. सहभागी अधिकाऱ्यांना IT साधनांवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण, तसेच EVM व VVPAT यंत्रांचे प्रात्यक्षिक व मॉक मतदान प्रक्रिया शिकवण्यात येणार आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

000

संजय ओरके/विसंअ/