इस्त्रायलच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. २७ : इस्त्रायलच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, इस्रायल वाणिज्य दूत कोबी शोशानी आणि मुंबईतील इस्रायल वाणिज्य दूतावासातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आपल्या भाषणात भारत आणि इस्रायल यांच्यातील ऐतिहासिक आणि आधुनिक संबंधांवर प्रकाश टाकला.

०००

गजानन पाटील/विसंअ/