Tuesday, February 7, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार पदांच्या भरतीसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे

Team DGIPR by Team DGIPR
July 4, 2020
in वृत्त विशेष, slider, Ticker
Reading Time: 1 min read
0
एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार पदांच्या भरतीसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती

मुंबई, दि. ४ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै २०२० या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.  

सद्यस्थितीत कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरीत झाले आहेत. परंतु राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडे सुमारे १७ हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सिंग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाईन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदे भरली जाणार आहेत. ही विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in  वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत. एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे १७ हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार  त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.

ही रिक्तपदे भरण्याकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे आयोजन करणे शक्य व योग्य नसल्याने या विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

अर्ज कसा करावा

राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.

मागील बातमी

गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्या

पुढील बातमी

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा!

पुढील बातमी
STAY CYBER SAFE ADVISORY

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 99
  • 11,301,387

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.