लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उपसचिव दिलीप देशपांडे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

श्री. धोंडिराम अर्जुन/स.सं/