नवी दिल्ली, दि. १ : “संघर्ष हा माझा धर्म आहे” या विचारांचे प्रतिक, समाजक्रांतीचे प्रणेते आणि थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी अण्णा भाऊ साठे विनम्र अभिवादन केले.
महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलप्ते यांनी यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि श्रमिकांसाठी केलेल्या योगदानाचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००