महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाख २३ हजारांची मदत

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्रात दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाख 23 हजार 969 रुपयांचा धनादेश विधानभवन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष अरूण रोडे, उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

फेस्कॉम ही महाराष्ट्रातील 1 कोटी 36 लाख जेष्ठांसाठी गेली 40 वर्षे कार्यरत असलेली सेवाभावी संघटना आहे. ज्येष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य सन्मानाने जावे यासाठी ही संघटना कार्य करते. शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध लोकोपयोगी उपक्रमात फेस्कॉमचा सहभाग असतो. संघटनेने आवाहन केल्यानुसार राज्यातील सभासदांनी या मदतीसाठी योगदान दिले आहे.