रविवार, जानेवारी 24, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Team DGIPR by Team DGIPR
ऑगस्ट 3, 2020
in वृत्त विशेष, slider, Ticker, ठाणे
1 min read
0
साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

भाईंदर पूर्व येथील ३७१ बेडच्या दोन समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण

ठाणे, दि. ०३ :- विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असुन त्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक,आ. गीता जैन, आ. रवींद्र चव्हाण, आ. रवींद्र फाटक आयुक्त विजय राठोड यांसह मनपा पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. सर्व यंत्रणांनी मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.

कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. योग्य औषधोपचाराबरोबरच रुग्णांची योग्य कळजी आणि रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाची असुन यामध्ये हयगय अथवा दुर्लक्ष होता कामा नये. या बाबीवरही स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रीत केल्यास मृत्यूदर कमी करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही.

स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, प्रभावी उपाययोजना कराव्यात यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल परंतु औषधांचा वापर कसा होतो याबाबत सदैव जागरुक राहुन नियमांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा अशा सुचना श्री. ठाकरे यांनी केल्या.

सदैव दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी प्रशासन व जनता यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. जनतेमध्ये सुरक्षित अंतर, मास्क वापरणे याबाबत जागरुकता आणण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मिरा भाईंदर मनपा हद्दीत कोरोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत काळजीपुर्वक करण्यात येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. नगरविकास विभागाकडून पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या मनपा क्षेत्रात अलगीकरण व विलगीकरण सुविधांची आवश्यकता आहे. त्या निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे, अँटीजन टेस्ट सुरु रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्यावतीने उभारण्यात आलेल्या या सुविधांबाबत माहिती दिली. भविष्यात म्हाडाकडे सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून कोरोना संकट लवकर दूर व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. आ. प्रताप सरनाईक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

मनपा आयुक्त विजय राठोड यांनी मनपाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची सद्यस्थिती, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदी विषयी सविस्तर माहिती दिली.

अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्र

भाईंदर पूर्व येथील स्व. प्रमोद महाजन सभागृह, गोपाळ पाटील रोड येथे अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्राची (Dedicated Covid Health Center) उभारणी करण्यात आली आहे. ७ हजार ९८० चौरस फूट जागेमध्ये उभारलेल्या या आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण २०६ बेड आहेत. हे सर्व बेड ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत. या केंद्रात नोंदणी, बाह्यरुग्ण व अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले असून अतिदक्षता विभागात दोन व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सहा किलोलिटर साठवण क्षमता असणारी ऑक्सीजन टाकी बसवण्यात आली आहे.

भाईंदर पूर्व (जि. ठाणे) येथील स्व. मीनाताई ठाकरे मंडई येथे उभारण्यात आलेल्या दुसऱ्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रात (DCHC) कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण १६५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व बेड ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत. याही आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सहा किलोलिटर साठवण क्षमतेची ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे.

या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. तसेच विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅबही उभारण्यात आली आहे. केंद्रात रुग्णांसाठी खानपानाची सुविधा असणार आहे. तसेच रुग्णांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे.

Tags: संसर्ग रुग्णालये
मागील बातमी

ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ठरणार उपयुक्त – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुढील बातमी
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 14,982
  • 6,274,244

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.