गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि कौतुक

0
12

मुंबई, दि 23 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले.  तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली.

 

अशा रीतीने फिरत्या स्वरूपातील या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल व एरव्ही गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. फिरत्या स्वरूपातील विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना असून यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार आहे असे ते म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी यानंतर के पूर्व विभाग विलेपार्ले येथील पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावाची देखील पाहणी केली तसेच सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here