मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मराठी बोला,मराठीत व्यवहार करा’ या विषयावर मराठी भाषा विभाग मंत्री, सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दि. २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रूपलक्ष्मी शिंदे- चौगुले यांनी ही मुलाखत घेतली आहे.
१४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जातो या पंधरवड्याचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करताना घेतलेली विशेष काळजी, शासकीय व्यवहारांबरोबरच खाजगी आस्थापनांमधून मराठीचा वापर वाढावा यासाठी करण्यात आलेले उपाय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मराठी भाषा विभाग-शासनाकडून सुरु असलेले प्रयत्न, तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेची आधुनिकतेशी सांगड घालावी यासाठी विभागाकडून करण्यात आलेले प्रयत्न, मराठी भाषाविकासासाठी भविष्यकालीन उपक्रम या विषयांची माहिती श्री. सुभाष देसाई यांनी या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.