मुंबई दि २९ : दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेडच्या हिंदीगृह पत्रिका ‘प्रेरणा’ च्या गणित -संगीत विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.
यावेळी दि न्यू इंडिया एश्योरन्सकंपनी लि चे महाप्रबंधक अंजन डे, व्यवस्थापकीय संचालक, इंद्रजीत सिंग, प्रेरणा तिमाही साप्ताहिकचे संपादक डॉ अमरीश सिन्हा, अतिथी संपादक शशी भूषण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून करण्यात आली. गोवा राज्याच्या माजी राज्यपाल स्व. श्रीमती मृदुला सिन्हा यांनी लिहिलेले गीत यावेळी सादर करण्यात आलं.
‘प्रेरणा’ या तिमाही विशेषांकाला २२ वर्षे पूर्ण झाले असून गणित -संगीत विशेषांकाचे हे तिसरे अंक आहे. राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मासिक वाचनाची आवड लोकांमध्ये कमी प्रमाणात दिसून येत आहे. तुम्ही प्रेरणा या मासिकाच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा देवून जागृत करीत आहात, ही चांगली बाब आहे. संगीत हे साहित्यिकाप्रमाणे काम करीत असते. साहित्यिक एक आंतरभावनेतून आलेली प्रेरणा आहे. कविता करणे हे आंतरभावनेची क्रिया असून त्यासाठी शिक्षणाची गरज भासत नाही. कोणताही हिशेब करण्यासाठी गणिताची आवश्यकता असते. त्यासमवेत संगिताचा समन्वय झाला तर कोणतेही काम करण्यात आनंद निर्माण होतो. प्रेरणाया मासिकावर आणखी काम करण्याची गरज यामध्ये अजून नवीन विषयांचा समावेश केला गेला पाहिजे. भाषेमध्ये ममत्व, करुणा, प्रेम असते ती भाषा एक चांगला व्यक्ती घडवीतअसते.
हिंदी भाषा बोलल्याने तिचा प्रचार आणि प्रसार होतो. ही भाषा सर्वत्र बोलल्याने देशाला जगासमोर नेण्यासाठी मदत करते. असेही श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.
०००