शिर्डी, दि. 30 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजना-1 अंतर्गत राहुरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र येथील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरण कंपनीच्या नाशिक विभागाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, राहुरीचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज लोकार्पण झालेल्या 5 एमव्हीए क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी सुमारे 1 कोटी 30 लाख रुपयांचा खर्च आला आहे. या ट्रान्सफॉर्मरमधून वटाळेवस्ती कृषी वाहिनी व येवलेआखाडा कृषी वाहिनी अशा दोन वाहिन्या काढण्यात आल्या आहेत. याचा लाभ तालुक्यातील तनपुरेवाडी, देसवंडी, कोंडवड, शिकेगांव, वाघाळा आखाडा, राहुरी खुर्द आणि राहुरी शहर या गावांना होणार असून योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. या ट्रॉन्सफॉर्मरवर शेतीचे 1 हजार 25 आणि बीगर शेतीचे 4 हजार 225 ग्राहक असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली.
0000