नागपूर,दि. १ : गृहमंत्री अनिल देशमुख तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. परिसरातील १५० वर्षे जुन्या बोधीवृक्षास भेट देवून बौध्दवंदना घेण्यात आली. माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, राजेंद्र जैन यांच्यासह बौध्द उपासक –उपासिका उपस्थित होते.