मी बासाहेब नानगुरे. सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील मिरज-पंढरपूर महामार्गालगतच सिध्देवाडी हे माझे छोटेसे गाव. गावचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून. माझी शेती शेजारच्याच सोनी ता. मिरज या गावात. दोन्ही गावे दुष्काळी पट्ट्यातील. पाण्याचा शाश्वत स्त्रोत नसल्यामुळं पावसावर अवलंबून असलेली…
मी सन 2019 च्या खरीप हंगामात सोनी गावातील 89 आर या जवळपास अडीच एकर क्षेत्रात सोयाबीन व शाळूची लागवड केली होती. सोयाबीन आणि शाळूचे पीक अगदी जोमात आलं होते. शेतीच्या कामासाठी व पिकांच्या खतासाठी सिध्देश्वर विकास सोसायटी, सिध्देवाडी येथून 25 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पीक अगदी जोमात असल्यामुळं पिकाची काढणी झाली की, त्याच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून सोसायटीचं कर्ज फेडणार होतो. पण सप्टेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पहिल्यांदा वाटलं पाऊस एक दोन दिवसात थांबेल, पण झालं उलटेच ऑक्टोबर महिन्यात अवकाळीचा जोरदार पाऊस सुरु झाला. शेताच्या परिसरात तर ढगफुटीसारखा पाऊस पडला. त्यामुळे शेतातील सोयाबीन आणि शाळू पिकाचे संपूर्ण नुकसान झाले. पिकाच्या नुकसानीसोबत शेतामध्ये भूस्खलनही झाले. त्यामुळे आता सोसायटीचे कर्ज कसे फेडायाचे असा प्रश्न होता..
अशा या संकटकाळाच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी शासनानं मदत करण्याचं जाहीर करुन अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्यक्ष शेतात येऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन पंचनामा झाला. 8 हजार 900 रुपये इतकी नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे मोठा आधार मिळाला.
नुकसानीची भरपाई मिळाली. संकटकाळात शासन पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मी शासनाचा आभारी आहे. यापुढील काळातही एखादे संकट आले तर शासन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, याची मला खात्री आहे. त्यामुळं शासनाचे मी पुन्हा एकदा आभार मानतो.
श्री. बाबासाहेब नानगुरे, सिद्धेवाडी, ता.मिरज, जि.सांगली