मुंबई, दि. 6 : महसुली कर व करेतर रक्कम भरणा करण्याची सुविधा देणाऱ्या ग्रास महाकोष (gras mahakosh Maharashtra) या अँड्रॉइड मोबाईल ॲपची निर्मिती महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागरे संचालनालयाने केली असून या ॲप्लिकेशनचे उद्घाटन वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या हस्ते नुकतेच झाले.
हे ॲप GRAS वेबसाईट व गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली असून एनआयसीचे तज्ञ अधिकारी बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा हे ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिक देखील २४X७ या ‘ग्रास’ ॲपचा वापर करुन शासनाच्या खात्यात रक्कम जमा करू शकतात. देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असलेल्या लेखा व कोषागरे संचालनालयामध्ये ग्रास (GRAS) मोबाईल ॲपचे विकसन हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
नवीन निवृत्ती वेतनधारकांना तातडीने पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) व PRAN कार्ड ऑनलाईन मिळण्याकरिता ONLINE PRAN GENERATION MODULE (OPGM) हे सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आले. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, नियंत्रक अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वेतन पडताळणी मार्गदर्शिका पुस्तक यावेळी प्रकाशित करण्यात आले.
या व्यतिरिक्त अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती करून घेऊन आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील? याबाबत मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. ही पुस्तके PDF स्वरुपात संचालनालयाच्या “महाकोष” या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
यावेळी प्रधान सचिव (ले व को) श्री. नितीन गद्रे, प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) श्री. राजगोपाल देवरा व सचिव (व्यय) श्री. राजीव मित्तल, लेखा व कोषागरे संचालक श्री.ज.र.मेनन, सहसंचालक श्री.जि.रा.इंगळे, उपसंचालक श्री.विनोद शिंगटे, सहायक संचालक श्रीमती प्रगती धनावडे व श्रीमती चित्रलेखा खातू उपस्थित होते.
लेखा व कोषागरे संचालक श्री.ज.र.मेनन यांनी सर्व नागरिकांनी सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी gras mahakosh Maharashtra या मोबाईल ॲपचा तसेच इतर सर्व सुविधांचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
००००
Now Pay your Government Receipts on the new GRAS – Mahakosh Maharashtra Mobile App
Mumbai, dt. 6 : The Directorate of Accounts and Treasuries (DAT), Maharashtra State, Mumbai has launched a mobile app for the payment of tax and non-tax revenues of the State Government. This app is developed by National Informatics Centre (NIC), Pune and was inaugurated by Additional Chief Secretary (Finance) Shri. Manoj Saunik on the 4th February, 2021 in Mantralay, Mumbai.
Any common citizen, Government department, firms and other organizations can now pay the tax/non tax revenues to the State Government 24*7 with the help of this app. This app is presently available in Android Version and can be downloaded from Google Play Store. Mr. Balkrishna Nair, Scientific Officer, NIC and his colleague Mr. Vishal Naldurgkar played a major role in the development of this app. Launching of this app marks an important milestone in the progress of the Directorate of Accounts and Treasuries, which is already carrying out major part of its tasks such as payment of bills, pensions via online mode.
Two booklets were also released at this function. One booklet is a compendium of procedures for pay fixation and pay verification as per the 7th Pay Commission. The second booklet is a set of guidelines for Drawing and Disbursing Officers with respect to the various claims raised by their offices at Pay and Accounts Office, Mumbai, District Treasury Offices and Sub-Treasury Offices. Both the above booklets will be available in PDF format on www.mahakosh.maharashtra.gov.in.
The Online PRAN Generation Module (OPGM) for the Government employees covered under the New Pension Scheme was also launched online in the same function.
Principal Secretary (Accounts and Treasuries) Shri. Nitin Gadre, Principal Secretary (Financial Reforms) Shri. Raj Gopal Deora and Secretary (Expenditure) Shri. Rajeev Mittal were present at this inaugural function.
Director, Accounts and Treasuries Shri. J. R. Menon, Joint Director Shri. J. R. Ingle, Deputy Director Shri. Vinod Shingte, Assistant Director Smt. Pragati Dhanavade and Smt. Chitralekha Khatu were also present at this function.
00000