मी अमित अशोक सोलापुरे. मी कोल्हापुरात रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आप्पा रेस्टाँरंट चालवतो. मी शिवभोजन योजना माझ्या रेस्टाँरंट मध्ये सुरु केली आहे. खरोखरच गरजवंतांसाठी महाराष्ट्र शासनाची शिवभोजन योजना वरदान ठरली आहे. लॉकडाऊनच्या काळात तर अवघ्या ५ रूपयात शिवभोजन थाळीनं अनेक भुकेलेल्यांची भूक शांत केली आहे.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा समाजातील तळागाळातील व गोरगरीब जनतेस निश्चितपणे फायदा होत आहे. कोल्हापुरातील सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२० रोजी शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या ठिकाणी सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर याची दक्षता घेवून या थाळीचे वितरण करण्यात येत आहे.
शिवभोजन थाळी सुरू करून शासनाने गरिबांची चांगली सोय केली आहे. ही योजना अत्यंत चांगली असून अनेक कामगार, निराधार वर्गाची उत्तम सोय झाली आहे. शिवभोजन थाळीला कोल्हापुरात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
शिवभोजन थाळीचा दर्जा अतिशय चांगला आहे. भोजनात वैविध्यदेखील असते. गोरगरिबांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरत आहे. अत्यंत कमी किमतीत ही थाळी मिळत असल्याने गरजू जनतेस नक्कीच लाभ होत असल्याच्या प्रतिक्रिया येथे भोजन करणारे लाभार्थी देतात.
कमी पैश्यांत उदर भरण करणारी शिवभोजन थाळी ही गरीब, निराधारांसाठी आधारवड ठरली आहे.
अमित अशोक सोलापुरे
कोल्हापूर
000