मुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कोरोनाशी सामना करताना’ या विषयावर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्युज ऑन एअर या ॲपवरून बुधवार, दि. २४, गुरुवार दि. २५ आणि शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२५ वाजता प्रसारित होणार आहे. निवेदक प्रा.सुभाष कदम यांनी ही मुलाखत घेतली आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरू असलेल्या उपाययोजना, कोरोना काळात सरकारी आदेशांचे पालन, कंटेनमेन्ट झोन करताना उद्भवलेल्या अडचणी, कोरोना काळातील नवीन अनुभव अशा अनेक विषयाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००