मुंबई दि. २७ : भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी, जि.अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. २७) डॉ.प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. के.पी. विश्वनाथ यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार ४ नोव्हेंबर २०२० पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.
कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी डॉ. लक्ष्मण सिंह राठोड, माजी महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ.ए.के.सिंह व राज्याच्या कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे सदर समितीचे सदस्य होते.
00000
Dr Prashant Kumar Patil is new Vice Chancellor
of MPKV Rahuri
Mumbai, 27: The Governor of Maharashtra and Chancellor of Universities Bhagat Singh Koshyari today appointed Dr Prashantkumar Patil as the new Vice Chancellor of the Mahatma Phule Krishi Vidyapith, Rahuri, District Ahmednagar.
Dr Prashantkumar Gulabrao Patil who is serving as the Director of the ICAR – Central Institute for Research on Cotton Technology has been appointed as Vice Chancellor for a term of 5 years from the date he assumes the office of the post of vice chancellor.
Dr Patil succeeds Dr K P Viswanatha whose term ended on 4th November 2020. Vice Chancellor of the Vasantrao Naik Marathwada Agricultural University Dr Ashok Dhawan was holding the additional charge of the post of vice chancellor.
The Governor had constituted a selection committee under the chairmanship of Dr Laxman Singh Rathore, former Director General, India Meteorological Department to recommend to him a panel of names suitable for appointment of the vice chancellor. Dr A K Singh, Director of Indian Agriculture Research Institute and Eknath Dawale, Secretary, Agriculture and ADF were members of the Committee.
000